नाशिक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली साडेतीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक

नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अस्लम सरदार शाह (वय 57, व्यवसाय -नोकरी, रेल्वे सुरक्षा बल, रा. आरपीएफ बॅरेक, नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव ओमप्रकाश यादव असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात आरोपीने स्वतःला मोतीलाल ओस्वाल, झिरोदा, एस.एम.सी. ग्लोबल आणि एंजल ब्रोकिंग या नामांकित शेअर ट्रेडिंग कंपन्यांचा एजंट असल्याचे भासवले. खडकपाडा, कल्याण येथे स्वतःचे ऑनलाइन ट्रेडिंगचे कार्यालय असल्याचे सांगून फिर्यादी व इतरांची विश्वास संपादन केला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्के परतावा मिळेल, अशी योजना संशयिताने मांडली. या आमिषामुळे फिर्यादी व त्यांच्यासारख्या इतर लोकांना वेगवेगळ्या रकमेची वैयक्तिक कर्जे काढण्यास भाग पाडून आरोपीने त्यांच्याकडून एकूण दोन कोटी 91 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणताही परतावा न देता गुंतवलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण 11 जणांची साडेतीन कोटींंची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक बिडकर आदी करीत आहेत.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago