हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली 14.85 लाखांची फसवणूक

इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
आजारपणाचे कारण सांगून हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली एका निवृत्त व्यक्तीची तब्बल 14 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग ताथू पाटील (वय 63 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. चव्हाण कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपी भिकूभाई पाडरीया (मूळ गाव हरिपुरा, ता. व जि. अमरेली, गुजरात राज्य) आणि किशन गुजराथी यांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
दि. 26 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या कालावधीत वडाळा-पाथर्डी रोडवरील गुरू गोविंद सिंग कॉलेज समोरील हॉटेल शिवानी, इंदिरानगर, नाशिक या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेतले. त्यासाठी वेळोवेळी एकूण 14 लाख 85 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे परत न देता विश्वासघात करून फसवणूक करत आरोपी पळून गेले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनराज पाटील करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *