पाडळी देशमुख शिवारात चार बिबट्यांचा मुक्त संचार

पाडळी देशमुख शिवारात चार बिबट्यांचा मुक्त संचार

■ रात्री अडीच वाजेपर्यंत गावकऱ्यांचा बिबट्यांवर पहारा

■ प्रभाकर आवारी
■ मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख तब्बल चार बिबटयाचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.वनविभाग मात्र सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पाडळी देशमुख येथील हिवरमाथा शिवारात आठवड्यापासून बिबट्यांच्या मुक्त संचाराने नागरिक भयभीत आहेत. या शिवारातील कुत्रे, पाळीव प्राणी यांना बिबट्याने भक्ष्य बनवल्याची घटना असतांनाच काल शुक्रवारी पाडळी देशमुख गावातील सखाराम धांडे यांचा अंत्यविधी आटोपून मळ्यांमधील नागरिक घरांकडे परतत असतांनाच सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या जवळच राहणारे विलास धांडे यांच्या घराजवळ एका मोटारसायकलवर बिबट्याने धाव घेतली ही माहीती गावकऱ्यांना समजल्यानंतर सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळासाहेब धांडे, विलास धांडे, गोकुळ धांडे, वैभव धांडे, डॉ.शुभम वारुंगसे, यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली त्यावेळेस बिबटे झाडावर दबा धरुन बसले होते व सदर घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगितली व बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडु नये यासाठी सदर गावकऱ्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी थांबुन होते. मात्र इगतपुरी वनविभागाचे कुणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. बिबट्यांनी लहान बालकांना आपले भक्ष्य बनविण्याच्या घटना इगतपुरी तालुक्यात अनेकदा घडल्या असुन तसा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना सदर घटनेमुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असुन इगतपुरी वनविभागाला याबाबत अनेकदा कळवूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल असा ईशारा पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, प्रल्हाद धांडे, रतन धांडे, कृष्णा चौधरी आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

19 hours ago