मुस्लिम चहाविक्रेत्याने वाटला मोफत चहा
निफाड । प्रतिनिधी
देशभरात श्री राम मंदिर उदघाटन सोहळ्याची तयारी पुर्ण झाली आहे प्रत्येक जण आपापल्या परीने या उत्सवाचा एक भाग होत आहे निफाड तालुक्यातील उगांव येथील अमृततुल्य चहा विक्री करणारे निसारभाई पठाण यांनी दोन दिवस मोफत चहा.वितरण सुरु केले आहे
निफाड तालुक्यातील उगांव येथे हिंदु मुस्लिम भाईचारा आहे उगांव येथील बाजारतळात असलेले अहिल सायकल मार्टजवळील दुकानातुन आज रविवार दि २१ व उद्या सोमवार दि २२ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रीराम भक्तांसाठी मोफत अमृततुल्य चहा वाटपाचा निर्णय घेत श्रीराम मंदिर उत्सवात सहभाग घेतला आहे हिंदु मुस्लिम बांधवांकडुन याचे स्वागत केले जात आहे
वाह ग्रेट बंधूनो