मुलींच्या आयटीआयमध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गाच्या युवतींकरिता मोफत प्रशिक्षण
नाशिक ः प्रतिनिधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक (मुलींची) नाशिक येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे मान्यतेने अल्पसंख्यांक (मुस्लीम, नवबौध्द, शीख, जैन, पारसी, खिशचन) प्रवर्गाच्या दहावी पास युवतींकरिता डाटा एन्ट्री ऑपरेटर या कोर्सकरिता 400 तासांचे विनामूल्य् प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या कोर्सकरिता प्रवेश मर्यादा 25 असून कोर्स पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे प्रमाणपत्र दिले जाईल. तरी जास्तीत जास्त इच्छुक युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. जेणे करुन भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
संपर्कासाठी पत्ता : शा. औ.प्र. संस्था, नाशिक (मुलींची), नाशिक फोन क्रं. 0253-2313514 प्रवेश घेण्यासाठी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य दिपक भा. बाविस्कर यांनी केलेले आहे.
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …