स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा वेध घेणारे फ्रीडम 75

नाशिक :प्रतिनिधी

61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल मंगळवार (दि.6)रोजी  महात्मा फुले अकादमी यांच्या वतीने  विक्रम गायकवाड लिखित व दिग्दर्शित फ्रीडम 75 हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. फ्रीडम 75  या नाटकात स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा कालखंडाचा वेध घेतला आहे. कोरोना काळात आणीबाणीच्या विरोधात कार्य केलेले त्यावेळचे काही लोक  एकत्र येतात. आणि देशासाठी कार्य करण्याचे ठरवतात. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशासाठी कार्य केलेले  थोर समाजसुधारक ,नेते ,यांच्याविषयी नाटकाच्या माध्यमातून माहिती देतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील दलित, आदिवासी ,महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे दुख मांडतात. व्यवहाराच्या पातळीवर लोकशाहीतील राजकारणातून त्यांच्या कार्यक्रमावर होणार हल्ला आणि त्यातून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा स्वातंत्र्य युद्ध पुकारावे लागेल असा विचार नाटकातून मांडण्यात येतात.

यातुन आजच्या लोकशाहीचे वास्तव मांडण्यात आले आहे.

नाटकात शरद पाडवी, प्रांजल खैरनार,मेहेर शेख, अविनाश सोनवणे, स्नेहल सजन,कार्तिक गायकवाड,पियुष शिनगारे,वैभव गायकवाड,संकेत चिकने,यश हाडोळे,समीर गायकवाड,आदील देवरे,केदार जानराव,ओंकार सोनवणे, सचिन काळे,अर्थव दाभाडे,आदित्य खैरनार,आदित्य थोरात ,शिवानी विभूते यांनी अभिनय केला.नाटकाची प्रकाशयोजना आदित्य शहाणे , संगीत अमोल काबरा,नेपथ्य गणेश सोनवणे व रसिका शिंदे,रंगभूषा माणिक कानडे ,संगीत शंकर अहिरे व सुनिल गोविंद,वेशभूषा सुर्वणा चव्हाण यांनी केली.

आज सादर होणारे नाटक: प्रतिकार, लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *