त्या प्रेमीयुगलाच्या आत्महत्येआधीचा मित्राचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
मनमाड: आमिन शेख
मनमाड नजीक असलेल्या वंजारवाडी येथील उज्वला खताळ व ज्ञानेश्वर पवार या प्रेमीयुगलाने नांदगाव नजीक असलेल्या
श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वेखाली आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात गावातील अनेकांची नावे होती. मात्र आत्महत्या झाल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र आता या प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका मित्राला कॉल केला होता. या कॉलची रेकॉर्डिंग सध्या सर्वत्र व्हायरल झाली असुन यात स्पष्टपणे आम्हाला कोणी कोणी त्रास दिला आणि आम्हाला न्याय द्या आमची रेकॉर्डिंग आमच्या घरच्या पर्यंत व पोलिसांपर्यंत पोहचवा, असे हे प्रेमीयुगुल फोनमध्ये बोलताना म्हणत आहे. वंजारवाडी येथील या प्रेमीयुगल जोडप्याने नांदगाव नजीक असलेल्या श्री श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वे खाली आत्महत्या केली मात्र या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले या महिलेने तर चक्क आमदार साहेब तुमच्या बहिणीला न्याय द्या अशी आर्त हाक देखील दिली आहे मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या प्रेमीयुगलाने त्यांच्या एका मित्राला कॉल केला होता. यामध्ये त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्रास दिला या सर्वांची नावे घेत आपल्या मित्राला हा कॉल रेकॉर्ड कर आणि आमच्या घरच्यांना व पोलिसांना देऊन आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न कर अशी आर्त हाक दिली आहे मुळात ज्यांची ज्यांची नावे त्या सुसाईट नोट मध्ये होती त्या सर्वांवर नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रेमीयुगल जोडप्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…