पालिकेला जाग कधी येणार, नागरिकांचा सवाल
नाशिक प्रतिनिधी
शहराला पावन करणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात मो ठ्या प्रमाणात पाणवेलींनी शिरकाव केल्याचे चित्र आह े. ही समस्या नित्याचीच झाली असून, या समस्येचा प्रश ्न कायमचा मार्गी लावण्यासाठी महापालिकेचा गोदावरी संवर्धन विभाग दोन कोटींच्या दोन नवीन मशीन खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याप्रकरणी अद्यापही मशीन खरेदीला मुहूर्त मि ळत नसल्याचे चित्र आहे. एकच मशीन असल्याने गोदावरी पात्र पाणवेलींतून मुक ्त करण्यासाठी पुरेसे नाही. सध्या पाणवेलीमुळे गोदेचे पात्र दुर्गंधीयुक्तबरो बर डासांची उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. दसक पंचक भागात मोठ्या प्रमाणात पाणवेली पसरल्या आहेत. पालिकेचे याकडे लक्ष कधी जाणार, असा सवाल नागरिकांम धून केला जातोय.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गो दा स्वच्छतेवर भर दिला जात असून, अनेक प्रकल्प हाती घ ेण्यात आले आहेत. अठराशे कोटींचा नमामि गोदा प्रकल्प राबवून याद्वा रे गोदेच्या उपनद्या व नाल्यांची पवई आयआयटीकडून स्वच्छता केली जाणार आहे. मागील चार -पाच महिन्यांपासून पाण्याचा प्रवाह क मी असल्याने गोदापात्राचा प्रवाह थांबलेला आहे. त्यामुळे पात्रात साचलेल्या पाण्यात पाणवेली झपा ट्याने वाढतात. दसक पंचक येथील मलजल शुद्धीकरण प्रकल्प जुनाट झाल ्याने प्रक्रिया न झालेले पाणी नदीत सोडले जात असल्य ाने
पाणवेली वाढत आहेत. मागील काही महिन्यांपासून नदीपात्रातून मोठ्य ा प्रमाणात पाणवेली काढण्यात आल्या आहेत. गोदावरी संवर्धन कक्षाकडून ही मोहीम सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून खरेदी केलेल्या मशीनद्व ारे पाणवेली काढल्या जातात. पण या मोहिमेसाठी आणखी दोन मशीनची आवश्यकता आहे. आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात नवीन मशीन खरेदी करण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सां गण्यात येत होते. मात्र, मशीन खरेदीसाठी हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात धरणातून विसर्ग सुरू झाल्यास पाणवेली वाहून जातात. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू असतो तोवर पाणवेली दिसून येत नाहीत. मात्र, पाण्याचा प्रवाह थांबताच नदीपात्रातील पा णवेलीचा प्रश्न उद्भवतो. दरम्यान, पाणवेली काढण्यासाठी तीन मशीनची आवश्य कता असताना सद्यस्थितीत एकच मशीनद्वारे काम सुरू आ हे. एकच मशिनरी असल्याने नदीपात्रातील पाणवेली काढण् यासाठी मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे.
निधी उपलब्ध होताच दोन नवीन मशीन खरेदीसाठी निवि दा प्रक्रिया राबवून मशीन खरेदी केली जातील. विशेषतः मार्च ते जून या कालावधीत पाणवेलींची समस ्या उद्भवत असते.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…