सर्व्हर डाऊनमुळे इंधन पुरवठा ठप्प; वेबसाइट हॅकची चर्चा

वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू

मनमाड : प्रतिनिधी
मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून राज्यातील पेट्रोलपंपांवर केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. कालपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाला असल्याचे कंपनीच्या वतीने सांगितले जात आहे. कंपनीची वेबसाइट हॅक झाल्याचीदेखील चर्चा होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. यामुळे खरोखरच वेबसाइट हॅक झाली की सर्व्हर डाऊन आहे, हे समजू शकले नाही. मात्र, या सर्व प्रकरामुळे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपांवर इंधन पुरवठा ठप्प झाला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून राज्यात वेगवेगळ्या भागातील पेट्रोलपंपांवर टँकरच्या माध्यमातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. कालपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला आहे.
मात्र, कंपनीच्या वेबसाइटला हॅक केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा नसल्याने नेमका काय प्रकार आहे हे समजू शकले नाही.
पानेवाडीच्या प्रकल्पातून रोज सुमारे 350 टँकरच्या माध्यमातून पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल पुरवठा केला जातो. मात्र, इंधन पुरवठा होत नसल्यामुळे अनेक पंप ड्राय झाले तर काही ड्राय होण्याच्या मार्गांवर आहे.
कंपनीतर्फे युद्धपातळीवर सर्व्हर सुरू करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पातून इंधन पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *