रात्रीस खेळ चाले !

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा अधिकृत प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आधी मिळालेल्या एक दिवसाच्या शांतता कालावधीत शहरात गुप्त प्रचाराला मोठ्या प्रमाणावर वेग आल्याचे चित्र आहे. जाहीर सभा, मिरवणुका आणि प्रचार फलक थांबले असले, तरी प्रत्यक्षात मात्र रात्रीस खेळ चाले अशीच परिस्थिती शहरातील अनेक प्रभागांत पाहायला मिळते. विविध पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधणे, मोबाइलद्वारे कॉल करणे, व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक संदेश पाठवणे, तसेच बंद दाराआड बैठका घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. काही प्रभागांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे वाटप, तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे गुप्तपणे वितरण होत असल्याची चर्चा होती.
प्रचाराची अधिकृत सांगता झाली असली, तरी प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचून आर्थिक गणिते जुळविण्याचे काम वेगाने सुरू असल्याची चर्चा आहे. गुप्त यंत्रणांच्या माध्यमातून घरोघरी पाकिटांचे वाटप सुरू असल्याचे बोलले जात असून, काही ठिकाणी खुले आर्थिक व्यवहार होत असल्याचेही सांगितले जात आहे. एका मतासाठी दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव ठरविण्यात आल्याची चर्चा आहे. संपूर्ण पॅनलसाठी वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम वाटली जात असल्याचेही ऐकायला मिळते. या कथित पैसे वाटपाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
एका मतासाठी हजारो रुपयांची रक्कम दिल्याच्या चर्चांमुळे लोकशाहीच्या पवित्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक म्हणजे विकास, धोरणे आणि लोककल्याण यावर आधारित असावी. मात्र, पैशांच्या जोरावर मतं विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यापूर्वीच्या काही निवडणुकांतही अशा तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याच पाश्वर्र्भूमीवर महानगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारची पुनरावृत्ती होणार की काय, अशी भीती सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शांतता कालावधीत कोणत्याही प्रकारच्या प्रचारास सक्त मनाई केली असून, नियम तोडणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पाश्वर्र्भूमीवर शहरातील संवेदनशील प्रभागांत प्रशासन व पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे.
संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, काही ठिकाणी वाहन तपासणी, नाकाबंदी, तसेच आकस्मिक भेटी देऊन कारवाईही करण्यात येत आहे. भरारी पथकांसह विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे.
दरम्यान, सुजाण मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता लोकशाही मूल्यांची जपणूक करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पैशांचे किंवा वस्तूंचे वाटप, तसेच गुप्त प्रचार आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदानाच्या आदल्या रात्री घडणार्‍या या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

Games are played at night!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago