नाशिक

सावळघाटात चालत्या वाहनांवर दरोडा टाकणारी सराईत टोळीे जेरबंद

दिंडोरी पोलिसांची यशस्वी कारवाई

दिंडोरी/नाशिक : प्रतिनिधी
नाशिक- पेठ महामार्गावरील सावळघाट परिसरात चालत्या वाहनांवर दरोडा टाकून माल लुटणारी सराईत टोळी दिंडोरी पोलिसांनी गजाआड केली आहे. अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना व मालवाहतूकदारांना हैराण करणार्‍या या टोळीमुळे दहशत निर्माण झाली होती. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे.
दि. 5 सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादींची आयशर गाडी (एमएच 21- बीएच 9922) सावळघाटातून जात असताना आरोपींनी ताडपत्री कापून पाच बॉक्स मोती साबण चोरीला नेले. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. 359/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अंतर्गत दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. मागील दीड-दोन वर्षांत याच ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असल्याने या टोळीचा शोध लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. खबरे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी टोळीचा माग काढला. त्यानुसार सुरगाणा, निफाड व दिंडोरी तालुक्यातील आठ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये रवींद्र अंबादास दळवी (वय 25, नागशेवडी, ता. सुरगाणा), माधव चंदर शेखरे (30, सुळपाडा, ता. सुरगाणा), लालू गोरख पवार (26, नागशेवडी, ता. सुरगाणा), गणेश हौसीराम कडाळे (32, नागशेवडी, ता. सुरगाणा), आनंदा भास्कर पवार (22, नागशेवडी, ता. सुरगाणा), दिनेश रामदेव गवारे (25, करंजाळी, ता. दिंडोरी), चेतन प्रभाकर चारोस्कर (25, गोंडेगाव, ता. निफाड), संजय प्रभाकर बेंडकोळी (30, लखमापूर, ता. दिंडोरी) यांचा सहभाग होता.
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. हे सर्व आरोपी दिवसभर शेतात काम करून रात्री एकत्र येऊन सावळघाटात दबा धरून बसत. घाटात वाहनांचा वेग कमी होताच काही आरोपी लक्झरी बस व मालवाहू वाहनांवर चढून ताडपत्री कापत व सामान खाली
फेकत. इतर साथीदार ते गोळा करून जंगलात घेऊन जात. या कारवाईत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल, छोटा हत्ती व मोटारसायकल जप्त केली. याशिवाय आरोपींकडून गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही धडक कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (कळवण) किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, मनोज खुळे, अल्ताफ शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, नागेश गायकवाड, हवालदार गुलाब पवार, विश्वनाथ काकड, पराग गोतुरणे, कमलेश देशमुख, प्रदीप शिंदे, अंमलदार दिलीप राऊत, प्रवीण भोईर, झांबरू सूर्यवंशी, दशरथ साबळे, विशाल पैठणकर, प्रकाश गायकवाड, अविनाश आहेर, ललित जाधव तसेच नाशिक ग्रामीण तांत्रिक विश्लेषण विभागाचे हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने मिळून ही कारवाई केली.

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago