मोबाइल चोरणार्‍या टोळीस अटक

नाशिकरोड रेल्वे पोलिसांची कामगिरी

नाशिकरोड/शिलापूर : प्रतिनिधी
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर 17 जून रोजी मोबाइल चोरीचे दोन गुन्हे घडल्याने पोलिसांनी गस्त वाढवून तीन जणांच्या मोबाइल चोरीच्या टोळीस अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीने प्रवाशांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाइल चोेरीचे 17 जून रोजी दोन गुन्हे घडले होते. प्रभारी अधिकारी सचिन बनकर. सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, पोलीस हवालदार भगवान बोडके, राज बच्छाव, कॉन्स्टेबल सुभाष काळे, रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक मनीष सिंह असे रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म नंबर तीनवर मुंबई बाजूकडे तीन जण संशयास्पद स्थितीत वावरताना आढळून आले. त्यांना संशयावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी नावे जासिम सलीम शेख (रा. घर नं. 401, अमृतनगर, मुंब्रा, जि. ठाणे0, राहुल रामभाऊ शिंपी (रा. ओमसाई राम अपार्टमेंट, दिवा-शिळा रोड, दिवा ईस्ट, जि. ठाणे), अब्दुल लतीफ अब्दुल हलीम खान (रा. अमृतनगर, मुंब्रा, जि. ठाणे) यांना नाशिकला येण्याचे कारण विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली.
त्यावेळी जासिन शेख याच्याजवळील बॅगेमध्ये एकूण 77 हजार रुपये किमतीचे मोबाइल मिळाले. त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली असता, राहुल शिंपी व अब्दुल लतीफ यांनी संगनमत करून रेल्वे स्टेशनवर प्रवासी रेल्वे गाडीत चढत असताना चोरल्याचे
सांगितले.
संशयित आरोपींकडे मिळालेले मोबाइल हे नमूद गुन्ह्यातील चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. एकूण पाच गुन्हे उघड करण्यास रेल्वे पोलिसांना यश आले. तपासी अंमलदार भगवान बोडके यांनी तिन्ही आरोपींना अटक
केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, धनंजय नाईक, शैलेंद्र पाटील, भगवान बोडके, रघुनाथ सानप, राज बच्छाव, सुभाष काळे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन कुमारसिंह, आरक्षक मनीष कुमार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *