नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल
सिडको : विशेष प्रतिनिधी
शिंदे येथील टोल नाक्यावर रविवारी चारचाकी वाहनातून आलेल्या एका टोळक्याने मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येणार्या वाहनातून आलेल्या या टोळक्याने टोल नाक्यावर असलेल्या सर्व टोल केबिनच्या काचा व इतर साहित्य हातातील दांडके व इतर वस्तूंनी फोडून टाकले. त्यामुळे टोल परिसरात मोठी गोंधळाची आणि घबराटीची परिस्थिती निर्माण झाली.
टोळक्याने आरडाओरडा करत टोलनाक्यावरील महिला कर्मचार्यांसह अन्य कर्मचार्यांना देखील दमदाटी करत शिवीगाळ केली. अशी तक्रार व्यवस्थापनाने पोलिसांकडे दिली आहे. विशेष म्हणजे संशयित हे मोह (ता. सिन्नर) येथील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे टोल नाक्यावर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
या प्रकारामुळे टोल नाक्यावर काम करणार्या कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…