पंचवटी : प्रतिनिधी
श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे गंगा गोदावरीचा दरवर्षी माघ महिन्यात जन्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला.
समिती अध्यक्ष अतुल पंचभय्ये यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी(दि.19)पासून माघ शुक्ल प्रतिपदेपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात यजुर्वेद संहिता पारायण, गुरुचरित्र एक चिंतन- वेदमूर्ती विनय सुनील ढेरगे. त्याचप्रमाणे विश्वकल्याणार्थ पंचदीनसाध्य शतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. यजमान म्हणून श्यामसुंदर गिरधारीलाल जोशी व परिवार दि. 30 जानेवारी रोजी महायागाची पूर्णाहुती व महाप्रसादाने सांगता होईल. बुधवारी (दि.28) गंगा मातेचा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता व संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे आकर्षण असलेल्या विविध स्पर्धा सोमवार(दि.19)पासून सुरू झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रामरक्षा, भीमरूपी, मनाचे श्लोक, यजुर्वेद संहिता, भगवद्गीता, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, भावगीत, भक्तिगीत, लेझीम, अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यात वेगवेगळ्या शाळांमधील विविध वयोगटांतील विद्यार्थी सहभाग नोंदवतात. त्यांना गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे योग्य असे स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
दि. 31 जानेवारी रोजी विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी माघ महोत्सव अध्यक्ष अतुल पंचभय्ये, उपाध्यक्ष तेजस गायधनी, अर्चक वेदमूर्ती अतुल गायधनी, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आदी प्रयत्नशील आहेत.
Ganga Godavari Panchkothi Purohit Sangh begins Goda Janmotsav
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…