दीड किलो गांजासह चार जणांना अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी

मुंबई महामार्गानजीक असलेल्या सर्व्हीस रोडलगत असलेल्या स्प्लेंडर हॉल येथून गुन्हे शाखा युनिट २ च्या वतीने दीड किलो पेक्षा जास्त गांजा घेऊन जाणाऱ्या चार जणांना मुद्देमालसाह ताब्यात घेतले आहे.
याबाबत युनीट २च्या पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी एका सँट्रो गाडीतून अनधिकृत गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून दुपारच्या सुमारास ४ इसम हे लाल रंगाची सॅन्ट्रो कार क्रमांक एमएच १४ एई ४३१७ यावरून नाशिक शहरातील व्दारका उड्डाण पुलावरून मुंबई हायवे दिशेने अंमली पदार्थ घेवून जाणार असल्याची माहीती मिळाल्यानंतर सदरची बातमीची खात्री करून गुन्हे शाखा, युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी व्दारका उड्डाणपुल ते पाथर्डीफाटा दरम्यान सापळा रचुन लाल रंगाची सॅन्ट्रो कारला स्प्लेंडर हॉल समोरील पंचर जवळ घेराव घालत थांबवुन रस्त्याच्या बाजुला त्याचे ताब्यातील कार थांबविली असता वाहनातील संशयित चेतन दिपक पाटील(वय २० वर्षे), पवन अशोक पाटील(वय २१ वर्षे़) ,प्रशांत गुलाबराव पाटील, (वय २९ वर्षे),निलेश विश्वास पाटील, (वय २६ वर्षे, सर्व राहणार डोली ता. पारोळा, जि. जळगाव) यांच्या ताब्यातुन एकुण १८,०००/- रू. किंमतीचा १६५१ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, तसेच १,००,००० रुपये किंची सॅन्ट्रो कार, ३०,००० रू किंचे मोबाईल फोन असा एकुण १,४८,००० रू किंचा मुददेमाल ताब्यात घेतला.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, हेमंत नागरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, संजय सानप, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, तेजस मते, दशरथ निंबाळकर, मधुकर साबळे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, रोहित आहिरे, जितेंद्र वजिरे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *