गणेशोत्सवासाठी भक्तांची, मंडळांची लगबग
नाशिक ः देवयानी सोनार
महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळे तसेच भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तयारीची लगबग सुरू झाली आहे. देखावे,रोषणाई,सजावट,वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असल्याने त्याच्या नियोजनास सुरूवात झाली असल्याचे शहरातील विविध गणेशमंडळातील पदाधिकार्यांनी सांगितले.त्यामुळे यंदा उत्सवास रंगत येणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनातील दोन वर्षाच्या संकटानंतर निर्बधमुक्त वातावरणात गणेशोत्सव होणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण उत्सवांवरील निर्बध,अटी शर्ती हटविल्याने यंदाचा गणेशोत्सव आणि इतर सण धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने त्यामुळे शहर,उपनगरातील छोटी मोठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे.मंडळातील गणपती पासून ते सजावट,रंगरंगोटी,देखावे यासाठी तयारी सुरू झाली आहे.
कोरोना काळात सण उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या.त्यामुळे जल्लेाशात उत्सव साजरे न होता घरगुती,साध्या पदध्यतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मिरवणूका,विसर्जन,देखावे,विद्युत रोषणाई,वाद्यांचा आवाज बंदच राहीला होता.
शहरातील रविवार कारंजा,भद्रकाली गणेश मंडळ, गुलालवाडी गणेशोत्सव मंडळ,नाशिकचा राजा,सह विविध छोट्या मोठ्या गणेशमंडळांची लगबग सुरू झाली आहे.गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला असून तब्बल महिनाभराचा वेळ असल्याने नियोजनासाठी वेळ मिळणार आहे.त्यामुळे विविध लायटिंग,सजावटीचे साहित्य,साऊंड सिस्टीम,देखावे याबरोबर सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळांच्या पदाधिकार्यांनी सांगितले. उंची आणि पीओपीच्या गणेश मूर्तींवरील निर्बंध उठविले किंवा नाही याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. आहे.त्यामुळे पीओपीबाबत निर्णय वर्षभर आधी जाहीर करण्यात यावा, असे मूर्तीकारागिरांचे म्हणणे आहे.
कोरोना काळातील दोन वर्षांनंतर यावेळी निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्यामुळे जल्लोषातच होणार आहे. त्याप्रमाणे तयारी सुरू झाली आहे. आगमन व विसर्जन मिरवणूक सुद्धा जल्लोषात होणार आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात मेडिकल कॅम्प व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महिनाभराचा अवधी असल्याने डेकोरेशन, लाईटींग, मंडप वगैरे ठरविणे गणेशोत्सव काळातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे.कार्यकर्ते वर जबाबदारी सोपवण्यात येत आहे
पोपटराव नागपुरे
रविवार कारंजा मित्र मंडळ
गणपती यंदा निर्बंधमुक्त साजरे होत आहे, तथापि,
फक्त उंचीवरचे निर्बंध उठवले आहेत. नागरिकांनी निट न ऐकता पीओपी परवानगी दिली असा समज करुन घेतला आहे. परंतु याबाबत आज न्यायालय सांगेल. पीओपीला परवानगी म्हणजे कंटेंट ऑफ कोर्ट होईल. परत विसर्जनाचाही मुद्दा आहे नैसर्गिक जल स्त्रोतात विसर्जनास बंदी आहे. सध्या कोर्टाने राज्य सरकारला पीओपी बंदीचे समान धोरण ठरविण्याचे आदेश दिले आहेत.
संतोष शहरकर
पारंपारिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ
अध्यक्ष : नाशिक जिल्हा
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…