गरबड येथे वयोवृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार
वडनेर खाकुर्डी पोलीसांनी शिताफीने केली अटक
मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील गरबड येथील एका ६० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या आरोपीला वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ६० वर्षीय वयोवृद्ध महिला रात्रीच्या वेळेला घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे प्रवेश करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आरोपी निघून गेला.
याप्रकरणी दि.२४ रोजी भांदवी ३७६,४५५,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आरोपी किरण देवाजी गुमाडे वय (वर्षे २६) याला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार ,पोलीस शिपाई डी. एन. वानखेडे, जी.डी. कासार यांच्या पथकाने शोध घेऊन जांबुटके ता. चांदवड येथून (दि.२५ )रोजी ताब्यात घेतले. अवघ्या चोवीस तासात वडनेर खाकुर्डी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण उपविभाग पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला सुचन्या देण्यात आल्या होत्या, त्यानुसार वडनेर खाकुर्डी पोलिसांनी आरोपींला तात्काळ अटक केली आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…