नगरसुल : प्रतिनिधी
गुुढीपाडव्यानिमित्ताने येथे साखरेचे हार-कडे यांची दुकाने थाटली असून, मागील वर्षीपेक्षा यावर्षी विक्रेत्यांची संख्या कमी आहे.
महागाई वाढल्याने विक्रेते माल भरण्यास धजावत नाहीत. माल तयार करण्यास मजुरांअभावी हातबल झाल्याने पर्यायी रेडिमेड माल खरेदीवर भर दिला, असे नगरसूल येथील साहेबराव पगारे यांनी सांगितले. मागील वर्षी प्रति किलो 160 रुपये भाव होता. या वर्षी हार-कडे प्रतिकिलो 200 रुपये आहे. मागील वर्षापेक्षा चालू वर्षी 40 रुपयांची वाढ झाल्याने त्याची झळ नक्कीच बसणार आहे.
आम्ही हार-कडे घरीच बनवायचो; परंतु डबल फिल्टर साखर आता 55 रुपये झालीे असून, मजुरी वाढली आहे. त्यामुळे आता रेडिमेड माल खरेदी करून तो विकावा लागत आहे. साखरेच्या हार-काड्यांमध्ये फार नफा नसून त्यात फूट मोठ्या प्रमाणात आहे. उरलेला माल बदलून मिळत नसल्याने तो सांभाळावा लागतो. खरेदीलाच भाव वाढल्याने विक्रीला भाव वाढला आहे.
– साहेबराव पगारे, हॉटेल परमानंद गिरी, नगरसूलGarland and bracelet shops flourish on the occasion of Gudi Padwa
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…