महिलेसह तीन बालके भाजली
नारायण बापूनगर मधील घटना
नाशिकरोड :प्रतिनिधी
गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आईसह तीन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना जेलरोड येथील नारायण बापू नगर येथे सोमवारी (दि.9) सकाळी नारायण बापूनगर येथे घडली. हा स्फोट एवढा भयंकर होता कीं, घरावरील पत्रे उडाली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तिच्या मुलांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की नारायण बापूनगर येथे लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे. या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरी राहतात. त्यात मोलमजुरी करणार्या भाडेकरूंचा समावेश आहे. आज सकाळी या चाळीतील एका घरामध्ये सुगंधा सोळंकी (वय 24) ही महिला मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना चहापाणी व जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले, तसेच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोळंकी या 50 टक्के भाजल्या असून, त्यांची मुले रुद्र (वय 5) हा 15 टक्के भाजला आहे, तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह तिच्या मुलांना प्रथम बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.
हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिंगाडा तलाव येथे असलेल्या अग्निशमन दलाच्या केंद्रास फोनद्वारे कळविली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष निकम, शांताराम गायकवाड, रामदास काळे, मनोज साळवे, श्रीकांत नागपुरे व अशोक मोदीयानी यांच्या पथकाने मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…