यात्रोत्सव असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता, व्यवसायावर परिणाम
कळवण : प्रतिनिधी
इराण-इस्त्राइल युद्धाचे चटके आता नाशिकसह ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत. स्वयंपाकासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी लागणार्या गॅसची टंचाई निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड येथे दि. 26 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत होणार्या यात्रेमुळे गॅसची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात्रोत्सव काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. त्यात खानदेशातून पायी येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय असते.
या काळात गड परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालये तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची मोठी लगबग असते. भाविकांच्या गर्दीमुळे स्वयंपाकासाठी गॅसचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, सध्या गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गॅसची टंचाई निर्माण झाल्यास भाविकांना तसेच स्थानिक व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने नाशिकसह ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कळवण तालुक्यातील व परिसरातही त्याचे परिणाम दिसत आहेत. कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने तीन-चार गॅस कनेक्शन घेतल्याचे आढळल्याने शासनाने गॅस पोर्टलद्वारे एका ग्राहकाचे एकाच कंपनीचे कनेक्शन सुरू ठेवून उर्वरित कनेक्शन निष्क्रिय केले आहेत.
मोफत भंडारा, स्टॉल्सवर होणार परिणाम
सप्तशंगगड यात्रोत्सवाला खानदेशातून पायी येणार्या लाखो भाविकांसाठी कळवण-नांदुरी मार्गावर सामाजिक संस्था व गणेश मंडळाकडून चहा, नाश्ता, जेवण व थंडपेयांचे मोफत स्टॉल लावले जातात. मात्र, गॅस पुरवठा खंडित झाल्यास हॉटेल्स, भंडारे व सेवा स्टॉलच्या व्यवस्थेवर परिणाम होणार असल्यामुळे यात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी गॅस पुरवठा नियमित ठेवण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.
Gas shortage at Saptashringgad
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…