जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान:
दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू
मोखाडा: नामदेव ठोंमरे
मोखाडा: जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या राजेवाडी या पाड्यात गॅस्ट्रोची साथ आली आहे. चिंटू गोंडा वय 55 आणि अनिता गांगड वय 45 या दोन व्यक्तींचा या साथीच्या आजाराने मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून. सध्या शासकीय रुग्णाला जव्हार येथे 14 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या पावसाळा सुरू असून गावाशेजारील विहिरीवरील पाणी गावकरी पीत असल्याने विहिरीतील दूषित पाण्यामुळे साथीचा रोग पसरला आहे. ही सात आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेत.दोन दिवसापूर्वी लोकांना जुलाब उलट्या त्रास व्हायला लागला मात्र त्याची तीव्रता वाढली. आणि अनेक नागरिकांना याचा त्रास होऊ लागल्याने नागरिकांना उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालय नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मयत झालेल्या व्यक्तींपैकी एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकच राहत्या घरी मृत्यू झाला आहे.
जव्हार नांदगाव येथे जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने तेथील लोकांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे सध्या पडणाऱ्या पावसात अस्वच्छता उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी विहिरीच्या भागात झिरपत असून विहिरीमध्ये दूषित पाणी साठते यातूनच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.
जव्हार मोखाडासारख्या दुर्गम भागातील गाव पाढे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत पावसाळ्यात साथीच्या रोगाची शक्यता वाढते याचा गरोदर माता, बालकास त्रास होतो. परिणामी असे साथीच
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…