नाशिकरोड : प्रतिनिधी
गावठी पिस्तोल बाळगणार्या एका संशयितास नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचत त्यास बेड्या ठोकल्या. यावेळी त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुस असा सुमारे 25 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विष्णू गोसावी व सागर आडणे यांना गुप्त माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ पिस्तोल घेऊन फिरत आहे असे समजल्यानंतर ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सामनगाव रोडवर असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ सापळा रचला पोलिसांना बघताच संशयित गुन्हेगार पळू लागला त्यानंतर त्याचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले असता त्याची चौकशी केल्यावर त्याचे नाव अक्षय गणेश नाईकवाडे असे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याची झडती घेतल्यास का त्याचे जवळ एक गावठी पिस्तोल एक जिवंत काडतुस आढळून आले.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश नायदे राजू पाचोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हवालदार अविनाश देवरे विष्णू गोसावी सोमनाथ जाधव सागर आडणे केतन कोकाटे संजय बोराडे अरुण गाडेकर गोवर्धन नागरे यांचे अभिनंदन केले.