नाशिक

गावठी कट्टा बाळगणार्‍यास ठोकल्या बेड्या

नाशिकरोड पोलिसांची कामगिरी

नाशिकरोड : प्रतिनिधी

गावठी पिस्तोल बाळगणार्‍या एका संशयितास नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचत त्यास बेड्या ठोकल्या. यावेळी त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुस असा सुमारे 25 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विष्णू गोसावी व सागर आडणे यांना गुप्त माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ पिस्तोल घेऊन फिरत आहे असे समजल्यानंतर ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सामनगाव रोडवर असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ सापळा रचला पोलिसांना बघताच संशयित गुन्हेगार पळू लागला त्यानंतर त्याचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले असता त्याची चौकशी केल्यावर त्याचे नाव अक्षय गणेश नाईकवाडे असे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याची झडती घेतल्यास का त्याचे जवळ एक गावठी पिस्तोल एक जिवंत काडतुस आढळून आले.

या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश नायदे राजू पाचोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हवालदार अविनाश देवरे विष्णू गोसावी सोमनाथ जाधव सागर आडणे केतन कोकाटे संजय बोराडे अरुण गाडेकर गोवर्धन नागरे यांचे अभिनंदन केले.

Ashvini Pande

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

2 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

2 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

2 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

2 days ago