गांवकरी नवरंगोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण
दै.गांवकरी ,कै शिवाजीराव देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्था , राधिका फाउंडेशन,नातू केटरर्स आणि मी उद्योजिका संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स क्लब पंचवटी यांच्या विशेष सहकार्याने नवरंगोत्सव 2022 या स्पर्धेचे नवरात्रोत्सव काळात आयोजन करण्यात आले होते. या नवरंगोत्सव स्पर्धेला महिला वर्गांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवशी 400 ते 500 फोटो महिलांकडून पाठवण्यात येत आहे. त्यापैकी निवडक फोटोंना प्रत्येक दिवशी प्रसिद्धी देण्यात येत होती. प्रसिद्ध झालेल्या फोटोतून प्रत्येक रंगाचे चार भाग्यवान विजेत्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. या स्पर्धेत भाग्यवान विजेत्या ठरलेल्या नवदुर्गांचा उद्या शनिवार (दि.8) रोजी सायंकाळी चार वाजता लायन्स क्लब हाॅल ,पंडित काॅलनी येथे आयोजित समारंभात आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जुही सचिन पाटील,अभिनेता चिन्मय उदगीरकर,अभिनेत्री उमा पेंढारकार, अभिनेता अतुल आगलंके, अभिनेता निलेश सूर्यवंशी , ब्राह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या नाशिक केंद्रप्रमुख वासंती दीदी, पूनम दीदी, पुष्पा दीदी, लायन्स क्लब अध्यक्ष राकेश सोनजे,प्रांत पाल ,लायन्स क्लब डाॅ.वैद्य विक्रांत जाधव, नीलिमा जाधव , कै.शिवाजीराव देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा चारुशीला देशमुख, राधिका फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सेवक, मी उद्योजिका एंटरप्राइजेस, संगमनेरच्या ज्योती सस्कर उपस्थित राहणार आहेत. या समारंभास भाग्यवान नवदुर्गांनी उपस्थित राहावे असे आवाहन दै.गांवकरीच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आहेत भाग्यवान विजेते
3.वैभवी सुलक्षणे -कुलकर्णी