मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा जाहीर

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर दि. 3 ते 15 सप्टेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत आहे.
प्रारूप प्रभागरचनेवर 3 ते 15 सप्टेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत आहे. हरकती व सूचना दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक विभाग, मनपा मुख्यालय येथे दाखल कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त हरकती व सूचनांची दखल घेतली जाणार नाही. आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे उपायुक्त गणेश शिंदे, निवडणूक कक्ष प्रमुख साजीद अन्सारी यांच्या पथकाने प्रभाग रचना तयार केली
आहे.
प्रभाग 1भायगाव संपूर्ण, प्रोफेसर क्वार्टर, महादेवनगर, हिम्मतनगर, साने गुरुजीनगर, दगडू नवीन ऑइल मिल, जुनी सिंधी कॉलनी, पंचशीलनगर, सोमवार बाजार, बालगधंर्व नाट्यगृह, हिंमतनगर पोलीस कॉलनी, टी.व्ही. टॉवर, बीएड कॉलेज, गवळीवाडा, जुना रिमांडहोम.

प्रभाग 2 महात्मा फुलेनगर, चंद्रमणीनगर, आदिवासी वस्ती,ग्रामपंचायत कार्यालय, गणेशनगर, ज्योती थिएटर, अलरजा हॉस्पिटल, इजहार-ए-अशरफनगर, मास्टरनगर, तन्जीमनगर.

प्रभाग 3- रमजानपुरा पोलीस स्टेशन, मौलाना अमीन दर्गाह, किनो शाळा, महाराष्ट्र सायजिंग, पॅराडाइज् हायस्कूल, मास्टर कॉलनी, अक्सा कॉलनी, मेमन कॉलनी, देवीमंदिर परिसर.

प्रभाग 4 सायने बुद्रुक गाव पूर्ण, मौजे दरेगाव पूर्ण, नवीन फरान हॉस्पिटल, देवीचा मळा, अख्तराबाद, मास्टर कॉलनी, फार्मसी कॉलेज, मदरसा मिल्लत, अब्दुल सत्तार आझमीनगर, गुलाब पार्क, पवारवाडी.

प्रभाग 5-बादशाह खाननगर, कोहिनूर कंपाउंड, ताश्कंद बाग, जाफरनगर, मोमीनपुरा, मोती तलाव, कमालपुरा, नागछाप झोपडपट्टी, जुना फरान हॉस्पिटल, नूर हॉस्पिटल.

प्रभाग 6- आयेशानगर, आंबेडकरनगर, म्हाडा प्लॉट, हजार खोली, नुरबाग, जम जम आइस फॅक्टरी, जलालाबाद, मेमन कॉलनी.

प्रभाग 7– नंदननगर, गणेशनगर, मर्चंटनगर, मदिनाबाद, अवामीनगर, गोंडवाडा, नवा इस्लामपुरा, आयेशानगर कब्रस्थान, शाबाननगर.

प्रभाग 8– गवळीवाडा, गफ्फारनगर, महेफुज कॉलनी, लालानगर, सलीमनगर, निहालनगर, विजयनगर, हिंगलाजनगर, अवलिया मस्जीद, सामान्य रुग्णालय, कल्लुकुट्टी.

प्रभाग 9- मालेगाव मार्केट कमिटी, कैलासनगर, श्रीरामनगर, संगमेश्वर स्मशान भूमी, या. ना. जाधव विद्यालय, संगमेश्वर गावठाण भाग, महादेव मंदिर, संगमेश्वर तलाठी कार्यालय, ज्योतीनगर भाग, काकूबाईचा बाग.

प्रभाग 10 -एम.एस.जी. कॉलेज, के.बी. एच. विद्यालय, ईदगाह ग्राउंड, रिमांड होम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर, स्टेट बँक, लोढा भवन, बारा बंगला, सटाणारोड हॉस्पिटल, रेस्ट हाउस.

प्रभाग 11- मोठाभाऊनगर, एकतानगर, जलधारा कॉलनी, साईबाबा कॉलनी, सोयगाव गावठाण, आंबेडकरनगर, मराठी शाळा, बँक कॉलनी, भाग्योदय कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पारस प्रोव्हिजन, एम. जी. पेट्रोल पंप.

प्रभाग 13-जैन स्थानक, सटाणा नाका,
रेमा थिएटर, नवीन वस्ती, रामनगर, मोतीनगर, पाटीलनगर, ज्योतीनगर उर्वरित भाग, योगेश्वर कॉलनी, साईबाबानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंद्रायणी कॉलनी, बोरसेनगर, देवरे प्लॉट, शरदनगर, अयोध्यानगर, न्यू सरस्वती फर्निचर.

प्रभाग 14- ईदगाह झोपडपट्टी, इस्लामपुरा, अन्सार रोड, निशात रोड, सय्यद महेमूद रोड, मोहन पीर गल्ली, यासीन मियॉ तकीया, तांबा काटा, किल्ला पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, जामा मस्जीद, गणेश मंदिर, महानगरपालिका मुख्य कार्यालय, सोमवार बाजार, वसंतवाडी, शहर पोलीस स्टेशन. प्रभाग 14- छोटा कब्रस्थान, मौलाना उस्मानपुरा, हकीमनगर, लतीफीया मस्जीद, गुरबेद मस्जीद, राबीया अब्दुल गफुर मस्जीद, मस्जीद खबाब इब्ने अरत, टेन्शन चौक, मदरसा जामेअतुस्वालेहात, जामीया अग्निशमन केंद्र, गेंदा मैदान, मुस्लीमनगर, मुस्लीमपुरा.

प्रभाग 15– मोठा कब्रस्थान सरदारनगर, बिरादर बाग, गोल्डननगर, दत्तनगर, बाग-ए-इस्हाक,बाग-ए-
महेफुज, शफीयाबाद, काश्मीरनगर.

प्रभाग 16- नजमाबाद, पवारवाडी, दातारनगर, म्हाळदेगाव (भागश:) प्रभाग 17-अन्सारगंज, करीमनगर, अब्बासनगर, रौनकाबाद, महेवीनगर, फिरदौस गंज, नुमानी नगर, अली अकबर हॉस्पिटल, सलामताबाद.

प्रभाग 18– म.नगर, उस्मानाबाद खंडेलवाल शाळा, राजानगर, मिस्त्री खाँ का बाडा, चुनाभट्टी.

प्रभाग 19– बोहरा बाग झोपडपट्टी, सिद्धार्थनगर, गालीबनगर, रसुलपुरा, किल्ला झोपडपट्टी, मोतीपुरा, हिरे गल्ली, मातामठ तालीम, महाराष्ट्र बँक, राजे बहादूर वाडा, इस्लामाबाद, अजमल व्हॉलीबॉल ग्राउंड, अजमल चौक.

प्रभाग 20– शब्बीरनगर, ग्यासनगर, अय्युबनगर, बापू गांधीनगर, चमननगर, हिलालापुरा, तहजीब हायस्कूल, शिया कब्रस्थान, खलीलशेठ सायजिंग, बजरंगवाडी, अमनपूरा.

प्रभाग 21– गुलशेरनगर, गुलशन-ए-यासीन, गुलशन-ए-मालिक, मासुमशा कुट्टी, मोहनबाबानगर, हिरापुरा, बफातीनगर, माळदे गावठाण आदी.

प्रारूप रचनेत चतुःसीमामधील किरकोळ बदल

महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा पंधरा दिवसांपूर्वी नगरविकास मंत्रालयाला सादर केला होता. निवडणूक आयोगाची अधिसूचना प्राप्त होताच बुधवारी (दि.3) मालेगाव महापालिकेची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. सदर कार्यक्रमाची जाहीर सूचना महानगरपालिका मुख्यालय व प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 4 तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप रचनेत चतुःसीमामधील किरकोळ बदल वगळता प्रभाग संख्या मात्र यापूर्वीचीच 21 इतकी कायम करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *