कचर्‍यात आलेली रक्कम घंटागाडी कर्मचार्‍याने केली परत

नाशिकरोड : प्रतिनिधी
घंटागाडीमध्ये नजरचुकीने कचर्‍यासोबत गेलेली रोख रक्कम कामगारांनी परत करत प्रामाणिकपणाचे सर्वांसमोर उदाहरण घालून दिले आहे. दरम्यान, घंटागाडीवरील चालक गणेश साळुंखे, कामगार उमेश कोळी, पितांबर अलकारी यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. नेहमीप्रमाणे जेलरोड परिसरातील घराघरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी गेली. पिंपळपट्टी रोड येथील महिला रंजना भालेराव या घराची आवरासावर करीत असताना पाच हजार रुपये कचर्‍याच्या डब्यात पडले. मात्र, हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळाने भालेराव यांच्या लक्षात गोष्ट आली आणि कचर्‍यासोबत आपली रोख रक्कम गेल्याचे कळले. यानंतर त्यांनी तात्काळ तनिष्क एंटरप्राइजचे सुपरवायझर ओम बोबडे, राहुल मोरे यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर संबंधितांनी या भागातील घंटागाडीवर कोण कर्मचारी आहे, याची माहिती घेतली. तेव्हा समजले की गाडी (क्र. एमएचप 15 एफएफक्यू 0362) या गाडीवर चालक गणेश साळुंखे असून, त्यांच्यासमवेत कामगार उमेश कोळी, पितांबर अलकारी यांच्याशी संपर्क साधला. कामगारांनी गाडीतील कचरा वेगळा केला. त्यात त्यांना पाच हजारांची रक्कम मिळून आली. सदरची रक्कम रंजना भालेराव यांना कामगारांनी परत केली. दरम्यान, या प्रामाणिकपणाचे परिसरातील नागरिक, महिला यांनी कामगारांचे कौतुक करीत आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *