दोन वर्षापासून पंचक, चेहडीतील घरपट्टी, पाणीपट्टी बील भरणा केंद्र बंदच
पालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना बसतोय फटका
सध्या पालिकेकडून नागरिकांनी त्यांची त्यांची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी भरावी याकरिता नोटीसा धाडल्या जात आहे. तसेच वारंवार आवाहनही केले जात आहे. मात्र्र असे असताना नागरिकांच्या सोयीचे बील भरणा खूद्द पालिकेनेच बंद करुन टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसतोय. नाशिकरोड विभागातील जेलरोड येथील पंचक व सिन्नर फाटा परिसरातील चेहडी येथे घरपट्टी व पाणीपट्टी बील भरणा केद्र दोन वर्र्षापासून बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून हे केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे.
जेलरोड मधील पंचक व चेहडीतील पालिकेचे पाणीपट्टी व घरपट्टी बील भरणा केद्र कोरोनाचे कारण देउन बंद करुन ठेवले आहे. दरम्यान पालिकेने ही बील भरणा केद्र सुरु केल्यास नागरिकाना होणार मानसिक त्रास कमी होणार आहे. नाशिक महापालिकेचे पंचक येथील आरोग्य केंद्रा शेजारी पाणीपट्टी व घरपट्टी बील भरणा केद्राची व्यवस्था केलेली होती. तसेच चेहडी येथील जकात नाका येथे बील भरणाची व्यवस्था करणयत आलेली असलेले येथेही अशाच पद्ध्दतीने नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. कोरोनामुळे पालिकेने हे बील भरणा केद्र बंद करुन टाकली.
पालिकेच्या या निर्णयाला त्यावेळी नागरिकांनी विरोध केला, मात्र कोवीड संपताच पुन्हा ही केद्र सुरु केली जातील. असे त्यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. परंतु कोवीड संपून वर्ष झाले अद्यापही ही हे केद्र बंदच आहे. ही दोन्ही केद्र नागरिकांच्या सोयीचे आहेत. पंचक परिसरात अयोध्या नगर, अमृतनगर, सदगुरु नगर, पिंपळ्पट्टी मळा, राजराजेश्वरी, मराठा कॉलनी, ब्रीज नगर, भारतभुषण नगर, पवार वाडी आदीसह विविध भागातील नागरिक बील भरण्यासाठी येत असत. त्यामुळे जेलरोड परिसरात हजारो मिळ्कतधारक असून त्यांना आता पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी एकतर शिवाजीनगर नाहीतर थेट नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयात जावे लागते. नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे महापालिका लक्ष क धी देणार, असा सवाल जेलरोड आणि चेहडी परिसरातील नागरिक करत असून लवकरात लवकर ही केद्र सुरु करण्याची मागणी केली जाते आहे.
आयुक्तांनी लक्ष घालून समस्या सोडावी
पंचक येथील घरपट्टी, पाणीपट्टी भरणा केद्र तत्काळ सुरु करण्यात यावे. कारण आमच्या परिसरातील अनेक नागरिक, महिल, ज्येष्ठ नागरिकांना बील भरण्यासाठी दूर ठिकाणी असलेल्या बील भरणा केंद्रावर जावे लागते आहे. त्यामुळे हे बील केद्र सुरु करण्यासाठी पालिका आयुक्तांनीच लक्ष घालावे.
पाठपुरवठा करणार
पाठपुरवठा करणारपूर्वी सुरु असलेल्या चेहडी गाव परिसरातील जकात नाका येथे घरपट्टी पाणीपट्टी बील भरणा केद्राची व्यवस्था होती. ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या प्रभाग 19 मधील नागरिकांचे हाल होत आहे. म्हणून पुन्हा हेे केद्र सुरु करण्यात यावे. याप्रकरणी आयुक्तांकडे पाठपुरवठा करणार आहोत.
पंचक व चेहडी येथील बील भरणा केद्र सुरु करण्याबाबत महिना भरापूर्वी पत्र पाठवण्यात आले होते. पुन्हा याबाबत लक्ष घालून सुरु करण्यासाठे प्रयत्न करु