नाशिक शहर

येथे दोन वर्षापासून घरपट्टी, पाणीपट्टी बील भरणा केद्र बंदच…

दोन वर्षापासून पंचक, चेहडीतील घरपट्टी, पाणीपट्टी बील भरणा केंद्र बंदच

पालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना बसतोय फटका

नाशिक (NASHIK) : प्रतिनिधी

 सध्या पालिकेकडून नागरिकांनी त्यांची त्यांची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी भरावी याकरिता नोटीसा धाडल्या जात आहे. तसेच वारंवार आवाहनही केले जात आहे. मात्र्र असे असताना नागरिकांच्या सोयीचे बील भरणा खूद्द पालिकेनेच बंद करुन टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसतोय. नाशिकरोड विभागातील जेलरोड येथील पंचक व सिन्नर फाटा परिसरातील चेहडी येथे घरपट्टी व पाणीपट्टी बील भरणा केद्र दोन वर्र्षापासून बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून हे केंद्र पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे.

   जेलरोड मधील पंचक व चेहडीतील पालिकेचे पाणीपट्टी व घरपट्टी बील भरणा केद्र कोरोनाचे कारण देउन बंद करुन ठेवले आहे. दरम्यान पालिकेने ही बील भरणा केद्र सुरु केल्यास नागरिकाना होणार मानसिक त्रास कमी होणार आहे. नाशिक महापालिकेचे पंचक येथील आरोग्य केंद्रा शेजारी पाणीपट्टी व घरपट्टी बील भरणा केद्राची व्यवस्था केलेली होती. तसेच चेहडी येथील जकात नाका येथे बील भरणाची व्यवस्था करणयत आलेली असलेले  येथेही अशाच पद्ध्दतीने नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. कोरोनामुळे पालिकेने हे बील भरणा केद्र बंद करुन टाकली.

पालिकेच्या या निर्णयाला त्यावेळी नागरिकांनी विरोध केला, मात्र कोवीड संपताच पुन्हा ही केद्र सुरु केली जातील. असे त्यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. परंतु कोवीड संपून वर्ष झाले अद्यापही ही हे केद्र बंदच आहे. ही दोन्ही केद्र नागरिकांच्या सोयीचे आहेत. पंचक परिसरात अयोध्या नगर, अमृतनगर, सदगुरु नगर, पिंपळ्पट्टी मळा, राजराजेश्वरी, मराठा कॉलनी, ब्रीज नगर, भारतभुषण नगर, पवार वाडी आदीसह विविध भागातील नागरिक बील भरण्यासाठी येत असत. त्यामुळे जेलरोड परिसरात हजारो मिळ्कतधारक असून त्यांना आता पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी एकतर शिवाजीनगर नाहीतर थेट नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयात जावे लागते. नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे महापालिका लक्ष क धी देणार, असा सवाल जेलरोड आणि चेहडी परिसरातील नागरिक करत असून लवकरात लवकर ही केद्र सुरु करण्याची मागणी केली जाते आहे.

          आयुक्तांनी लक्ष घालून समस्या सोडावी
पंचक येथील घरपट्टी, पाणीपट्टी भरणा केद्र तत्काळ सुरु करण्यात यावे. कारण आमच्या परिसरातील अनेक नागरिक, महिल, ज्येष्ठ नागरिकांना बील भरण्यासाठी दूर ठिकाणी असलेल्या बील भरणा केंद्रावर जावे लागते आहे. त्यामुळे हे बील केद्र सुरु करण्यासाठी पालिका आयुक्तांनीच लक्ष घालावे.
सुनीता भोजने, सामाजिक कार्यकर्त्या, प्रभाग 23
पाठपुरवठा करणार
पाठपुरवठा करणारपूर्वी सुरु असलेल्या चेहडी गाव परिसरातील जकात नाका येथे घरपट्टी पाणीपट्टी बील भरणा केद्राची व्यवस्था होती. ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या प्रभाग 19 मधील नागरिकांचे हाल होत आहे. म्हणून पुन्हा हेे केद्र सुरु करण्यात यावे. याप्रकरणी आयुक्तांकडे पाठपुरवठा करणार आहोत.
पंडीत आवारे, माजी नगरसेवक (प्र.19) प्रभाग सभापती, ना. रोड.
पंचक व चेहडी येथील बील भरणा केद्र सुरु करण्याबाबत महिना भरापूर्वी पत्र पाठवण्यात आले होते. पुन्हा याबाबत लक्ष घालून सुरु करण्यासाठे प्रयत्न करु
सुनिल आव्हाड, विभागीय अधिकारी, ना.रोड
Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago