घोटी सिन्नर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
धामणगाव: सुनील गाढवे
घोटी सिन्नर हायवे वरून भरविहीर फाटा येथे समृद्धी महामार्गावरील
वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिंपळगाव मोर येथे ट्रक नादुरुस्त झाल्याने येणाऱ्या वाहतूक व वाहन चालकांनी कुठलेही नियम न पाळल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून पिंपळगाव मोर पासून घोटी देवळेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने वाहनचालकांचे देखील मोठे हाल झाले आहे त्यातच साईड पट्ट्यांच्या बाजूला पावसामुळे चिखल असल्याने साधे मोटरसायकल चालकांना देखील आपला रस्ता शोधणे कठीण झाले आहे त्यामुळे ट्राफिक कधी मोकळी होईल असा प्रश उदभवला आहे.प्रत्यक्ष पोलीस प्रशासनाला पोहोचणे देखील कठीण झाले आहे या चक्काजाम मुळे परिसरातील कामानिमित्त जाणारे प्रवासी शेतकरी विद्यार्थी नोकरदार यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.
या महामार्गावर समृद्धी औरंगाबाद, नागपूर जाणारी वाहतूक,भंडारदरा,अकोला,भगूर , सिन्नर,घोटी व मुंबई इत्यादी परिसरातून वाहतूक होत असते तसेच इगतपुरी तालुक्यातील स्थानिक ४०/४५ गावांची वर्दळ त्यामुळे या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पाहा व्हीडिओ