छोरी भी छोरों से कम नहीं…!
महाविद्यालयांत हाणामारीचे प्रकार वाढले
नाशिक ः प्रतिनिधी
मुलगी शिकली प्रगती झाली. याबाबत बोलताना छोरी भी छोरोंसे कम नही, हा दंगल चित्रपटातील संवाद मुलींचे कौतुक करण्यासाठी अभिमानाने उच्चारला जात असत. परंतु गेल्या काही दिवसांत महाविद्यालयीन तरुणींचे सोशल मीडियावर जे काही हाणामारीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत ते पाहता महाविद्यालयात एकेकाळी विद्यालयाचे आवार विद्यार्थ्यांच्या हाणामारीने गाजायचे. आता गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता विद्यार्थिनीही हाणामारीत मागे नसल्याने छोरी भी छोरोंसे कम नही, असे उपरोधिकपणे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महाविद्यालयात मुलींमध्येच भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहेत. थेट फायटरसारख्या हत्याराचा वापर करीत लाथाबुक्यांसह झिंज्या उपटण्यापर्यंत मारामारीच्या घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींमध्ये हिंसकपणा वाढीस लागण्याचे कारण मोबाइल,बॉयफ्रेन्ड एकमेकींबद्दल गैरसमज निर्माण करणे हे असल्याचे आतापर्यंत तीन ठिकाणच्या फ्रीस्टाइल मारामारीत समोर आले आहेत. विशेष म्हणजे हाणामारी सोडविण्याऐवजी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात चढाओढ दिसून आली. एखाद्या मुलाने मुलींची छेड काढल्यास मुलाला यथेच्छ चोप देणार्या घटनाही घडतात. एकमेकांची मैत्री, प्रेम आदी कारणांहून मुलामुलांच्या हाणामार्या होतात.परंतु मुलीमुलींचीही याच कारणांहून भांडणे होत असल्याने चर्चेचा विषय बनत आहे. लहान मुलांची लुटुपटूची भांडणे खेळतांना अनेकदा होतात. पुन्हा विसरून एकत्र येतात. महिलांची भांडणे नवी नाहीत. नळावरील भांडणे सर्वाना परिचीत आहेत. परंतु मुलीही आता भांडणात अग्रेसर होत आहे.आपला मित्र,बॉयफ्रेन्ड यांतील मैत्री प्रेम यासह एकमेकांबद्दल अफवा, गैरसमज आदी कारणांमुळे मुलांप्रमाणे मुलींमुलींचेही भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे.