येवला तालुक्यात एन्झोकेमच्या पहिल्या पाचमध्ये विद्यार्थिनीच
नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 2024-25 दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन मंगळवारी जाहीर झाला. शहरासह जिल्ह्यात दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील बहुतांश विद्यालयांमध्ये पहिला पाच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त मुलींचा समावेश आहे.
येवल्यात यशश्री वाकचौरे अव्वल
येवला ः येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यशश्री वाकचौरे हिने 98 टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तालुक्यात पहिल्या चार विद्यार्थिनी एन्झोकेम विद्यालयाच्या आहेत. विद्यालयात प्रथम यशश्री वाकचौरे (98 टक्के), द्वितीय स्वरा मोरे (97.80), तृतीय तितीक्षा बिन्नर(97.60), चतुर्थ सृंजल देसले (96.40), पाचवा क्रमांक समीक्षा महादार, दीपिका सोनवणे, निराली पटणी व साईश्रुती यादव (प्रत्येकी 93.40 टक्के) यांनी मिळविला. संस्थेच्या येवला तालुक्यातील धामणगाव येथील विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला. ऋषिकेश जाधव 85.80 टक्के, यश चव्हाण 83.20 टक्के, वैष्णवी गवळी 80.60 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. न्यू इंग्लिश स्कूल, उंदीरवाडी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. त्यात सृष्टी क्षीरसागर 92.20 टक्के, समृद्धी काळे 91 टक्के व कावेरी क्षीरसागर 90.20 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष डॉ. मनीष गुजराथी, सरचिटणीस सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष अशोक शाह, प्रशासनाधिकारी दत्ता महाले, संस्थाचालक, प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक अनिल शेलार, उच्च माध्यमिक विभागप्रमुख कैलास पाटील, बाळासाहेब वाबळे, सुभाष नागरे आदींनी अभिनंदन केले.