सत्ता द्या, नाशिकची आईसारखी सेवा करू,उपमुख्यमंत्री शिंदे : दत्तक नाशिकवरून नाव न घेता भाजपावर टीका

सत्ता द्या, नाशिकची आईसारखी सेवा करू

उपमुख्यमंत्री शिंदे : दत्तक नाशिकवरून नाव न घेता भाजपावर टीका

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमध्ये सत्ता मिळूनही कुठलीच कामे मागील काही वर्षात झाली नाही. काही लोकानी नाशिक दत्तक घेऊनही काहीच झाले नाही. मात्र मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू. कारण आमचा अजेंडा हा विकासाचा असून आम्ही प्रगती करणारे आहोत. स्थगिती देणारे नाही. असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक च्या सभेतून नाशिकरांना आवाहन केले. तसेच भाजपचे नाव न घेता ठाकरे बंधूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दत्तक नाशिकवरुन टीका केली.
……….
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (दि. १०) शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास पाचशे चौरस फुटापर्यतच्या घरांना घरपट्टी माफ, सिडकोतील पंचवीस हजार घरे फ्री होल्ड, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या तपोवनवरून भाजपला सर्व विरोधक घेरत आहे, तेथील झाडे वाचवण्याचे अश्वासन देत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे, माजी खा. समीर भुजबळ, हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर आदी सह दोन्ही कडील प्रमुख नेते व उमेदवार उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिहंस्थ कुंभमेळा निमित्ताने हजारो कोटीची कामे शहरात होणार आहे. नाशिक साठी आपण हजारो कोटींचा निधी विकास कामासाठी मंजूर केला आहे. सर्वसामान्य लोकांना सोन्याचे दिवस आणायचे आहे.त्यासाठी आपले प्रयत्न आहे. नाशिक मधील युतीचे सर्व उमेदवार तगडे आहे.
प्रभू रामचंद्र. यांचे निशाण धनुष्यबाण आहे. आमची युती ही विकासासाठी आहे. अनेक वर्ष सत्ता असताना यापूर्वी च्या लोकांनी काही केले नाही. नाशिक चाचेहरा मोहरा आम्ही बदलणार आहोत यासाठी तुमची साथ हवी आहे. नाशिक मधील प्रत्येक विभागात स्पर्धा परीक्षा सेंटर सुरू केले जाईल. आणि या निवडणुकीतून विरोधकांचा टांगा पलटी करायचा असल्याचा टोला मारला.

चौकट….
तुमच्या उमेदवारांनी माघार का घेतली
काही ठिकाणी आमचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले मात्र याचा काहींना त्रास झाला. मला त्यांना विचारायचं आहे आमचे उमेदवार उभे असताना तुमच्या उमेदवारांनी माघार का घेतली असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
……….
लाडकी बहिणीत विघ्न आणण्याचे काम
लाडकी बहीण सुरूच रहाणार असून त्यात काही जणांनी विघ्न आणायचे काम केले. अगदी न्यायालयात काहीजण गेले. मात्र त्यांना लाडक्या बहिणींनी आडवे केले. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून ती कोणीही बंद करू शकणार नाही असल्याचे शिंदे यांनी सांगत सदर योजना आपणच सुरु केल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
………
नाशिकच्या विकासासाठी कोट्यावधी चा निधी दिला. एन एमआरडीद्वारे काम केले जात असून आजूबाजूचा भाग शहाराशी जोडला जात आहे. नगरविकास खाते आपल्याकडे असल्याने मनपा म्युनिसिपल बॉन्डला मंजुरी दिली. नाशिक कुंभमेळ्यासाठी सिंहस्थ प्राधिकरण स्थापना केली. पण याचे श्रेय हे एकाचे नव्हे तर सर्वाचे असल्याचे सांगून अप्रत्यक्ष त्यांनी भाजपावर टीका केली.
…..
पर्यावरणचा समतोल साधूनच कुंभमेळा

पर्यावरणचा विचार करूनच सिहंस्थाचे काम होईल.आणि यात पर्यावरण समतोल राखूनच सिंहस्थ होईल. याद्वारे आम्ही तपोवन वाचवू आणि गोदावरी प्रदूषण मुक्त करू अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय नाशिकला पर्यटन केंद्र करायचे असल्याचे म्हटले.
…….,….

शिंदेकडून या घोषणा

नाशिक पालिकेत सत्ता आल्यास आम्ही विविध सुविधा नाशिकरांना देऊ असे म्हणतं निवडणुकीच्या तोंडावर नाशिकरांना खुश करण्यासाठी काही घोषणा केल्या. त्यात त्यांनी म्हटले कीं, पाचशे चौरस फुटांपर्यंत घरांची घरपट्टी माफ करू. नाशिक शहरातील इमारतीचा ठाणे प्रमाणे पुनर्विकास प्रकल्प राबवताना पन्नास टक्के एफएसआयची तरतूद करू त्याच धर्तीवर पुण्याच्या धर्तीवर नऊ मिटर रुंदी च्या रस्त्यावर तीस मीटर करण्याचा प्रयत्न करू. एनएमआर डी अंतर्गत शहराच्या आजुबाजुला विकसित करणार, सिडकोची घरे फ्री होल्ड करू, होणार्‍या कुंभमेळ्या चे सूक्ष्म नियोजन केले जाईल. मुंबई नाका, द्वारका वाहतुक कोंडी वर काम केले जाईल. नाशिक च्या उद्योग चळवळी ला चालना दिली जाणार .
……………………

चौकट

*लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठिशी* *राहणार : ना.भुसे*
मोठ्या भावाने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली नाही.
नाशिककरांचा अपमाना केला.अशी टीका भुसे यांनी भाजपावर केली. मतदानाच्या माध्यमातून अपमानाचा मतप्रदर्शन नाशिककर करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिक मनपावर भगवा फडकला पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना आहे. खांदेशी मतदारांना भुसे यांनी अहिराणीतून साद घातली. महिलांसाठी शिंदे यांनी विविध योजना राबवल्या त्यामुळे लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठिशी उभ्या राहतील असे भुसे म्हणाले.
……………………………
चौकट

 

ठाकरे बंधुचा सुंभमेळा*

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी नाशिक शहरात ठाकरे बंधुचा सुंभमेळा भरला होता अशी जोरदार टीका शिंदे यांनी केली आहे. बिस साल बाद एकत्र आले कारण तीस साल बाद काय होणार याची त्यांना चिंता सतावते अशी टिका केली.. कोणी कोणाशी युती करू द्या नाशिककर महायुतीचा भगवा फडकणार मनपावर फडकणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. काही लोक निवडणूकीत पावसाळ्यातील छत्री प्रमाणे उगवतात.दिवसभर नेटफ्लिक्स पाहायचाय जनतेच्या प्रश्नात त्यांना कोणताही रस नाही अशी टिका राज ठाकरे यांच्यावर केली. तर काही लोकांना विकासापेक्षा तिजोरीमध्येच अधिक रस आशी टिका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आमचा अजेंडा विकासाचा आहे. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या साडे तीन वर्षात भरीव निधी दिला.
नाशिक शहराचा कुंभमेळ्यात चेहरा मोहरा बदलणार . कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार करणार असा इशारा शिंदे यांनी दिला.
………………………………………

चौकट

सभा उशिरा तरी उत्साह कायम*

एकनाथ शिंदे यांना सभास्थळी पोहचण्यासाठी उशिर झाला. साडे नऊ च्या दरम्यान एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले मात्र भाषणाला उशिर झाला असला तरी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कसूभरही कमी झाला नव्हता .

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago