सिडको : विशेष प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून, नाशिकचा विकास अपेक्षित असेल तर शहरातही भाजपचेच प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक असल्याचे सांगत नाशिकच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या, असे आवाहन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून अ गटातून रूपाली यशवंत निकुळे, ब गटातून मंगला प्रकाश नन्नावरे, क गटातून संध्या अभिजित कुलकर्णी, तर ड गटातून चंद्रकांत खोडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते
यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, विजय चौधरी, रवी अनासपुरे, माजी महापौर सतीशनाना कुलकर्णी, अविनाश आंधळे, सुनील खोडे, श्याम पाटील, यशवंत निकुळे, प्रकाश नन्नावरे, अमृता सांगळे, अर्जुन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी यावेळी विरोधकांवर टीका करत काही उमेदवार नागरिकांची दिशाभूल करत असून, गुंडगिरी व व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून, अशा प्रवृत्तींना येथे थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
या प्रचाररॅलीचा प्रारंभ प्रभाग क्रमांक 23 मधील श्री श्री रविशंकर मार्गावरील जीपीएस 99 हॉटेल येथून श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर ही रॅली विधातेनगर, कुर्डुकरवाडी, कल्पतरूनगर, अशोका मार्ग, हिरेनगर, गुलशन कॉलनी, आनंदनगर, ममतानगर, मित्तलनगर, शिवगिरीनगरमार्गे जाऊन वडाळा चौफुली येथे सांगता करण्यात आली. रॅलीदरम्यान संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता.
यावेळी मंगेश काजे, अविनाश बिचकुले, सुनील माधव खोडे, प्रीतम गोस्वामी, हर्षद सोनवणे, भीमा मंगळुरे, सुनील कुलकर्णी, श्री. कहाणे साहेब, कातकाडे साहेब, अनिल पवार, सोमनाथ आव्हाड, शांताराम नव्हाळे, बडगुजर साहेब, सरोदे साहेब, शिंपी साहेब, कविता शितोळे, नंदा बिचकुले, पूनम शिंदे, पेठकरताई, कहाणेताई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Give opportunity to BJP candidates for the development of Nashik: N. Mahajan