गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले ६ गोवंशीय जनावरांचे प्राण

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले ६ गोवंशीय जनावरांचे प्राण

लासलगाव प्रतिनिधी

मुंगसे शीवरातून कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मालेगाव तालुका पोलीसांनी पकडल्याने ६ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याची माहिती संतोष केंदळे लासलगाव,बजरंग दल विशेष संपर्कप्रमुख नाशिक जिल्हा यांनी दिली आहे.या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर रोजी पहाटे 02:30 वाजेचे सुमारास गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी,विलास जगताप यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती दिली की, एम एच 43 ए डी 7607 या सफ़ेद रंगाच्या बोलेरो 407 टेम्पो वाहनातून सहा गोवंशाची नाशिक गावाकडून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तानाजी शिंदे दादा,पीएसआय सूर्यवंशी,बागुल दादा मुंगसे गावापुढे,नायरा पेट्रोल पंपाजवळ थांबले असता पहाटे 02:45 वाजेच्या सुमारास सदर वाहन भरधाव वेगाने येताना दिसले.पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन थांबवले. यावेळी वाहन चालकाला विचारपूस केली असता, सदर जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पोलिसांनी वाहनांमध्ये बघितले असता सहा गोवंश जनावरे पाय तोंड दोरीने घट्ट बांधून, निर्दयतेने, कोंबलेल्या अवस्थेत, जखमी करून कत्तलीसाठी वाहतूक करून असताना दिसून आल्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीची खात्री झाली.

त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात आरोपी वाहन चालक असलम खान अब्बास खान, जाकीर हुसेन नगर, मालेगाव, जिल्हा नाशिक याचे विरुद्ध पोलीस शिपाई तानाजी शंकर शिंदे यांच्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 अ, 9, 11 सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याबाबत प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11, 4 व मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 181, 3 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रू.65,000 किमतीची गोवंश जनावरे व 3,50,000 किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा रू 4,15,000 किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सचिन दादाजी गायकवाड करीत आहेत. सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *