नाशिक

कवडासर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

दिंडोरी : प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही थांबत नसून, दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याने अनेकांचे जीव घेतले असून, तरीदेखील बिबट्याचा बंदोबस्त अद्यापही सुरूच असून, असे किती बिबटे दिंडोरी तालुक्यात आपलं वास्तव्य टिकून आहेत. त्यातच दिंडोरी येथे दोन दिवसांपूर्वी बदादे वस्ती येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश मिळाले, मात्र हे बिबटे अजून किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न शेतकरी वर्गांमध्ये निर्माण झाला असून, अजूनही बिबट्याचे वरदस्त कमी होताना दिसत नसून, दिंडोरी तालुक्यात कवडासर येथे बिबट्याने दुपारच्या वेळेस एका शेतकर्‍याच्या शेतात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत तिला आपले कंठस्थान बनविले. त्यामुळे येथील परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याचा तात्काळरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
त्याचबरोबर दिंडोरी तालुका हा आता बिबट्यांचा एक टर्निंग पॉइंट बनलेला असून, राजरोसपणे बिबट्या मानवी वस्तीत येऊन शेतकर्‍यांच्या पशुधनाचे नुकसान करीत असून, मानवालाही याचा धोका निर्माण झाला आहे. बिबट्याच्या भीतीपोटी शेतकर्‍यांनी आपल्या शेतातले काम दुपारपर्यंतच करून घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कवडासर येथील काही शेतकर्‍यांनी सांगितलेले आहे. याबाबत सदरील बिबट्याचा वन विभागाने शोध घेऊन यास पिंजर्‍यात जेरबद करावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.

Goat killed in leopard attack in Kavdasar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago