नाशिक:प्रतिनिधी
नाशिककरांनी नवीन वर्षाचे स्वागत थंडीत केले आहे.नवीन वर्षात किमान तापमानात घट झाली..परिणामी वर्षाच्या अखेरीस वाढलेला थंडीचा कडाका नवीन वर्षात अधिक जाणवत आहे..राज्यभरात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. उत्तरेकडून थंड वार्याचे प्रवाह सुरू झाले आहेत.त्यामुळे शहरातील थंडीचे प्रमाण वाढले आहे. तर येत्या काही दिवसात पारा खाली जाण्याचा अंदाज हवामन तज्ञांनी व्यक्त केला आहे.परिणामी नवीन वर्षात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात काही भागात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेतल्या काही राज्यात थंडीची लाट आली आहे. उत्तरेल्या वार्याचा प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.जानेवारीत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी पारा असण्याची आहे.परिणामी नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत केले आहे.तर येत्या आठवड्यात किमान तापमानात अधिक घट होण्याचा अंदाज आहे. तर शहरातील कालचे किमान तापमान 10.2 तर कमाल तापमान 30.2 अंश होते. नाशिक शहराप्रमाणे निफाडचा पाराही खालावला आहे. निफाडचा पारा 7 अंशापर्यंत खाली आल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र थंडी वाढल्याने द्राक्ष बागायतदारा आणि इतर शेती पिकांना बसत आहे.