गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा
गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरीचे गटारीकरण तत्काळ थांबवावे, अशी मागणी करणारे निवेदन गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळाला अ दर्जा दिल्याबद्दल नाशिककरांतर्फे सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले. नाशिक तीर्थस्थळाला अ दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा. गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. गोदावरी नदीला गटारमुक्त करण्यासाठी अपयश आलेल्या निष्क्रिय समिती बरखास्त करून या सर्व कामावर देखरेख ठेवण्यासाठी नवीन समिती टास्क फोर्स तात्काळ नेमण्यात यावी. या माध्यमातून गोदावरी जतन व संवर्धन करण्यात यावे, जोपर्यंत महापालिकेकडे गोदावरी तिच्या उपनद्या यांना जाणार्या सांडपाण्याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत एसटीपी मलनिस्सारण प्लॅन्टला मंजुरी देऊ नये तसेच शहरातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन नवीन इमारत बांधकाम परवाने देण्यात येऊ नये.
कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या साधूग्राम जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून या अतिक्रमणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुसलमान गोडाऊन चा वापर, गोमास भंगाराचे दुकाने आणि अवैध्य विक्री त्या ठिकाणी होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. तरी त्या ठिकाणी तात्काळ जागा संपूर्ण खाली करून कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी
श्रीमहंत मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश गिते
,यश बच्छाव, दिपक जाधव ,तुषार मोसले,दिलीप जोगदंड, निकाळजे, अनिल साजवे,वरुण कदम,अनिल पवार, मयुर कसबेकर, दृष्यांत शिंदे, चेतन देशमुख ,अकांक्षा काशीकर, दीपाली राऊत, आर ए भाडूसे, रवि पाटील उपस्थित होते.
या प्रमुख मागण्या
नाशिक तीर्थस्थळाला अ दर्जा देण्यात यावा.
गोदावरीला गटार मुक्त करण्यासाठी निष्क्रिय समिती बरखास्त करून नवीन समितीने तात्काळ निर्णय करा.
तो पर्यंत महापालिकेने कुठलाही एसटीपी मलनिस्सारण केंद्र निविदा काढू नये तसेच बांधकाम परवानगी बिल्डिंग प्लॅन मंजूर करू नये. साधूग्राम वरील सर्व अतिक्रमण तात्काळ काढा.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…