गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर
चांदोरी भागातील मंदिरे पाण्याखाली
नाशिक: प्रतिनिधी
नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार पावसाने जिल्ह्यातील गंगापूर ८४ टक्के, मुकणे ५० टक्के, दारणा ८८ टक्के, वालदेवी ९७ टक्के, काश्यपी ४६ टक्के, गौतमी गोदावरी ८० टक्के, पालखेड ७८, वाघाड ६० टक्के भरले तर गोदावरी नदीला शहरात सुरू असलेल्या पावसाने पहिला पूर आला असून 12 वाजता 500 तर 3 वाजता 1 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून जोरदार पाऊस असून, पावसाची संतत धार आजही कायम असून, आज दि ४ रोजी दुपारी १२:०० वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग ५००क्यूसेस सोडण्यात येणार आहे आणि दुपारी ३वाजे वळेस एकूण विसर्ग १००० क्यूसेस करण्यात येणार आहे तसेच पावसचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल. तर सायखेडा आणि चांदोरी भागात नदीत असलेले मंदिर देखील पाण्याखाली, आजही नाशिकला ऑरेंज अलर्ट असल्याने मुसळधार पावसाची शक्यता तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशार, दारणा धरणातून २२ हजार तर नांदूर मधमेश्वर धरणातून ३६ हजार क्यूसेक्स
ने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.
मंत्रालय कक्षाची सूचना
भारतीय हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत नाशिक व पुणे घाट रायगड ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.
मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई.
–