दोन वर्षानंतर गोदावरी एक्स्प्रेस लासलगाव स्थानकात दाखल
लासलगाव प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या शिष्टाईला यश आले असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,मनमाड,निफाड तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गोदावरी एक्स्प्रेस प्रयोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.कोराना काळात रेल्वे प्रवासी,सरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय विचारात घेता प्रवाश्यांच्या मागणीची दखल घेऊन ना.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वेसेवेची मागणी केली होती.
ना.डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नांनी गोदावरी एक्सप्रेस सोमवारी सकाळी ११-१५ वा लासलगाव रेल्वे स्थानकात आली.यावेळी लासलगाव जि.प सदस्य ङी के जगताप,बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी डॉ.भारती पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून गोदावरी एक्सप्रेसचे स्वागत केले.यावेळी बुकिंग ऑफिसर जोशी,राजाभाऊ चाफेकर,स्मिता कुलकर्णी,ज्योती शिंदे,शैलजा भावसार,रंजना शिंदे,बापू लचके,नितीन शर्मा सह लासलगाव प्रवासी संघटने सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा मागणी केल्यानंतर तब्बल पावणे दोन वर्षानंतर गोदावरी एक्सप्रेस प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी सुरु करण्यात अली आहे.कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून रेल्वे प्रशासनाने मार्च २०२० मध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या होत्या.टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत असून गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…
View Comments