गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी डॉ. दीप्ती देशपांडे

नाशिक :प्रतिनिधी
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार या पदांवर एस.एम. आर. के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या व संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांची नियुक्ती झाली. संस्थेच्या जनरल बॉडी मिटींग मध्ये सर्वमताने काल हा निर्णय घेण्यात आला.
बी.वाय.के. महाविद्यालयात प्राध्यापिकापदापासून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. नंतर एस.एम.आर. के महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख, उपप्राचार्या व नंतर प्राचार्या पदावर त्यांनी आपल्या कार्याची मोहोर उठविली. संस्थेत ही त्यांनी शाखा सचिव, नाशिकच्या विभागीय सचिव तसेच मानव संसाधन संचालिका अशा अनेक महत्वाच्या जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या. शिक्षण क्षेत्रात कार्याचा त्यांचा 38 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
स्त्री शिक्षणासाठी स्थापन झालेल्या एस.एम.आर.के. महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी त्यांच्या गरजांप्रमाणे व आवडीप्रमाणे अनेक पाठ्यक्रम एका छताखाली सुरु केले. विद्यार्थिनींना अध्ययनासाठी अत्यंत मोकळे व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले. ह्या महाविद्यालयाचा नेतृत्व करून त्यांनी महाविद्यालयाला ’बेस्ट इन्स्टीट्यूट इन वेस्ट इंडिया ’ हा सन्मानाचा पुररकार मिळवून दिला व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षा गौरव पुरस्कार – 2022 ही देण्यात आला. संस्थेबरोबरच त्यांनी एस.एन.डी.टी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अनेक महत्वाच्या पदांवर कार्य केलेले आहे. अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विद्यार्थी पीएच.डी. साठी संशोधन करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

One thought on “गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी डॉ. दीप्ती देशपांडे

  1. नियमाप्रमाणे वेळेत टोल घेत वा तांत्रिक अडचण आल्यास barrier open करुन वाहतूक सुरळीत करावी,२४ तासात नियमाप्रमाणे टोल माफी होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *