संजीव नगर परिसरात मध्यरात्री गोळीबार
सिडको : वार्ताहर
सातपूर अंबड लिंकरोड वर वादातून एकाने त्याच्या कडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला असल्याची घटना घडल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात , सहाय्यक आयुक्त सोहील शेख , अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख , सहाय्य्क निरीक्षक वसंत खतेले , उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, संदीप पवार यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ व पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणा बाबत तपास सुरु आहे , मात्र ज्यांनी गोळीबार केला ते फरार असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत . दरम्यान संजीव नगर परिसरात पोलीस छावणीबीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.