लासलगाव : प्रतिनिधी
गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने पिकअपमधून वाहतूक करणाऱ्या पीकअप गाडी सह दोघांना लासलगाव पोलिसांनी पकडले.बुधवारी पहाटे चारच्या सुमारास लासलगाव चांदवड रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली असून या मध्ये तीन लाख रूपये किंमतीचे गोमांस व पिकअप गाडी असा एकूण आठ लाख पन्नास हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी धोंडीराम घोडे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबीन अबुलहसन शेख,कुरेशी नगर,कुर्ला ईस्ट मुंबई व इम्तियाज अहमद कुरेशी,कुरेशीनगर,कुर्ला ईस्ट,मुंबई हे दोघे एम एच ०३ डी व्ही १७९९ या पिकअपमध्ये गोमांस भरून मुंबई येथे विक्रीसाठी लासलगाव ते चांदवड रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर पीकअप गाडी पकडली असता यामध्ये गोवंशीय जनावराचे २०० किलो मांस मिळून आले.या कारवाईत पोलिसांनी पिकअप तसेच गोमांस असा आठ लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पीकअप गाडी मधील मोबीन अबुलहसन शेख व इम्तियाज अहमद कुरेशी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नी देविदास लाड करत आहे.
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…