खुशखबर! आता मुलीच्या लग्नासाठी मिळवा तब्बल ‘इतकी’ आर्थिक मदत; आत्ताच करा अर्ज

पी एम शादी शगुन योजन

अन्न धान्य, शेती, आर्थिक योजना, या प्रकारच्या योजना नेहमीच सर्वसामान्यांसाठी राबवल्या जातात. आज अशाच एका योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत ज्याद्वारे सरकार तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे.
आजवर भारत सरकारद्वारे मुलींसाठी तसेच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक योजना राबवल्या. यात बेटी बचाओ; बेटी पढाओ, मुलींना मोफत सायकल, अनेक वेगवेगळ्या शिष्यवृत्ती जाहीर करणे अशा योजनांचा समावेश होतो. याशिवाय भारत सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा पुढे करत मुलींच्या विकासासाठी ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात देते.
भारतात सर्वच जाती धर्माचे लोक सलोख्याने राहतात असं आपण म्हणू शकतो. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवतात. सामान्य लोकांच्या कल्याणासाठी बऱ्यापैकी प्रयत्न सरकारद्वारे केला जातो.
अनेकदा लग्न म्हटलं की आर्थिक स्तराचा विचार करावं या लागतो. मात्र, मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला आर्थिक स्तरावर कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशातून प्रधानमंत्री शगुन योजनेची सुरुवात करण्यात आली.2017 मध्ये ही योजना सुरू झाली
प्रधानमंत्री शादी शगुन योजना 8 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्न करावयच्या मुलीने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे. एक प्रकारे ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देते.
अर्ज करण्याची पद्धत –
तुम्हालाही प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला याप्रमाणे अर्ज करावा लागेल.
यासाठी, तुम्हाला अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://maef.nic.in/schemes वर जावे लागेल, त्यानंतर तुम्ही येथून स्वतःची नोंदणी करू शकता.
जेव्हा केव्हा अल्पसंख्याक समाजातील मुलगी पदवीनंतर लग्न करते किंवा तिचे लग्न होते. त्यावेळी या योजनेंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार
प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा लाभ देशातील अल्पसंख्याकांच्या यादीत येणाऱ्या अशा कुटुंबांना उपलब्ध आहे. तसेच, या योजनेचा थेट लाभ त्या मुस्लिम मुलींना आहे ज्यांना बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. या राष्ट्रीय शिष्यवृत्ती अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी समाजातील मुलींना दिल्या जातात.

Devyani Sonar

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

5 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

7 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago