मिठे गुड दे विच मिल गिया तिल उड्डी पतंग ते खिल गिया दिल
समाजमाध्यमांवर संक्रातीसाठी शुभेच्छांची धूम
नाशिक ःप्रतिनिधी
मिठे गुड दे विच मिल गिया तिल उड्डी पतंग ते खिल गिया दिल हर पल सुख ते हर दिन शांती पाओ रब अग्गे दुआ तुसी लोहडी खुशिया नाल मनाओ हॅप्पी लोहडी अशा रोचक संक्रातीच्या शुभेच्छां समाजमाध्यमंावर एकमेकंाना पाठविल्या जात आहे.
केवळ महाराष्टीयन मराठी बांधवच नाही तर विविध हिंदू धर्मीय आपआपल्या परंपरेने संक्रातीचा सण साजरा करीत आहे.मकरसंक्रात सण(दि.15) संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाम मध्ये भोगली बिहू ,पंजाब मध्ये लोहिरी, राजस्थान मध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.एकमेकंाना भेटून शुभेच्छा दिल्या जातात.कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर सण समारंभ उत्साहात साजरे होत असतांना दूरच्या मित्रपरिवार आप्तेष्टांना सोशल मीडियाद्वारे मकरसंक्रातच्या शुभेच्छा देण्यात येत आहे.सर्वधर्मीय आपआपल्या पारंपरिकतेनुसार आधुनिकतेचा साज देवून गमतीशीर शुभेच्छा दिल्या जात आहे.