लासलगाव प्रतिनिधी
बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या पीक अप गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मालेगाव ग्रामीण पोलीसांनी पकडल्याने ०८ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याची माहिती संतोष केंदळे लासलगाव,बजरंग दल विशेष संपर्कप्रमुख नाशिक जिल्हा यांनी दिली आहे.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार उमराणे गावाकडून मालेगाव शहराकडे कडे ०८ गोवंश जनावरे पीक अप गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकाना मिळाली होती.यावरून गोरक्षक मच्छिंद्र शिर्के,विलास जगताप,गोसावी महाराज आणि इतर गोरक्षक गाडी अडवण्यासाठी उमराणा फाट्यावर उभे असता सदर पीक अप गाडी त्याठिकाणी आल्यानंतर या सर्व गोरक्षकानी गाडीचा पाठलाग केला व मुंगसे गावाजवळ सदर गाडी पकडण्यात गोराक्षकाना यश मिळाले.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी याबाबत ची माहिती मालेगाव ग्रामीण पोलिसांना कळवली असता पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पीक अप गाडी चालकासह ०८ गोवंश जनावरे ताब्यात घेतली.या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…