मालेगाव मनपा, नगरविकास विभागाविरुद्ध गंभीर तक्रार
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिका व नगरविकास विभागातील काही अधिकार्यांकडून शासकीय पत्रव्यवहारासाठी अधिकृत सरकारी ईमेलऐवजी खासगी जीमेल खात्यांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करत याबाबत राज्य व केंद्रीय स्तरावरील विविध अधिकार्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ग्रीन मालेगाव ड्राईव्हचे कलीम अख्तर मोहम्मद युसूफ अब्दुल्ला यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) तसेच इतर संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात निवेदन पाठविले आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, भारत सरकारच्या ‘ ई-मेल पॉलिसी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया तसेच राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार सर्व शासकीय पत्रव्यवहार @gov.in qH$dm@maharashtra.gov.in या अधिकृत डोमेनवरूनच करणे बंधनकारक आहे. मात्र मालेगाव महानगरपालिकेकडून gmail.com सारख्या खासगी ईमेल सेवेचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच अधिकृत ईमेलवर कायमस्वरूपी ‘ऑडिट ट्रेल’ उपलब्ध असताना खासगी ईमेलमधील माहिती कधीही हटविता येत असल्याने निविदा प्रक्रियेत फेरफार, प्रत्यक्ष काम न करता बिले काढणे आदी प्रकारांशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका तक्रारीत व्यक्त केली आहे.मुंबई येथील नगरविकास विभागातील काही अधिकारीही नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांचा पत्रव्यवहार अधिकृत ईमेलऐवजी खासगी जी-मेलवर करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे ‘डेटा सॅव्हरिनिटी’ आणि सार्वजनिक नोंदींच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणणे आहे.
Government correspondence from private Gmail
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…