शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा आरोप
नाशिकः
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृह, वित्त सारख्या अनेक महत्वाची आणि अर्थपूर्ण खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप मध्ये दुसरा कोणी आमदार, कार्यक्षम नाही की फडणवीस यांनाच सत्तेचा मलिदा खायचा आहे? असा सवाल शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी करत आता तरी नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस यांनी स्वत्तंत्र गृहमंत्री द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना प्रवकत्या सुषमा अंधारे यांची कृषीथॉन प्रदर्शनापूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आजचा दौरा अनौपचारिक आहे . नाशिक जिल्ह्यात महा प्रबोधन सभा त्यासाठी येणार आहे १६ ते १८ डिसेंबर रोजी येणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, टीका करत नाही .कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार आहे. भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे. भाजपच्या वळचणीला गेल्या नंतर त्यांचे संस्कार हिन झाले आहे. गुलाब राव पाटील यांचा माज तसेच अब्दुल सत्तार यांची भाषा बदलली. किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे काढून काहीच मिळत नाहीये. त्यामुळे सोमय्या यांना एखादं मंत्री पद द्यावे असेही
अंधारे यांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनिल बागुल, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.
राणे यांच्यावर टीका
मी कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने राणे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलांना चांगले संस्कार दिले नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळेच आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ झाले आहेत. त्यांना आता तरी राणे यांनी काही वेळ काढून शिकवण द्यावी असेही आवाहनही अंधारे यांनी केला.
एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मुलींवर अत्याचार होऊनही राज्य शासन ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र आज कोणत्या वळणावर चालला आहे याचा जनतेनेच विचार करावा असे ही अंधारे म्हणाल्या.