सी.पी.राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर स्वागत
नाशिक : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे स्वागत केले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, महानगरपालिका उपायुक्त प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.