नाशिक : प्रतिनिधी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे काल सकाळी नाशिक दौर्यासाठी ओझर विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे हे त्यांच्यासमवेत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्या वतीने राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.