गोविंदनगर परिसरातही बिबट्याचा वावर

सावतानगरसह गोविंदनगर परिसरातही बिबट्याचा वावर

नाशिक –
शहरातील सावतानगर पाठोपाठ  मुंबई नाका नजिकच्या गोविंदनगर भागात शुक्रवारी पहाटेनंतर बिबट्याचा वावर आढळून आल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. तसेच परिसरातील रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी पहाटे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडकोतील सावतानगर येथील संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

सावतानगर पाठोपाठ गोविंदनगर परिसरातही बिबट्या आढळून आला. परिसरातील अशोका प्राईड इमारतीजवळ बिबट्या आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत. हे वृत्त समजताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *